Ad will apear here
Next
नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीप्रीत्यर्थ पुण्यात जल्लोष

पुणे : भारताचे १५ वे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी, ३० मे २०१९ रोजी शपथ घेतली. सलग दुसऱ्यांदा ते या पदावर विराजमान झाले आहेत. त्यांच्या शपथविधी सोहळ्याप्रीत्यर्थ पुण्यात ठिकठिकाणी मोदी समर्थकांनी जल्लोष केला. 

सावरकर स्मारक येथे शीख बांधवांनी जल्लोष केला. ढोलाच्या तालावर भांगडा नृत्य सादर करत, ‘बार बार मोदी सरकार, फिर एक बार मोदी सरकार, अशा घोषणा देत, त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनाही सरबत वाटप करून, या आनंदात सहभागी करुन घेण्यात आले. 


या वेळी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, नगरसेवक आदित्य माळवे, वृक्ष संवर्धन समिती सदस्य संदीप काळे, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, दत्तात्रेय खाडे  यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भाजप शहर अध्यक्ष योगेश गोगावले आणि शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रदीप रावत यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात संदीप खर्डेकर, चरणजीतसिंग सहानी, दिलीप उंबरकर, सतीश गायकवाड, शरणजीतसिंग बग्गा, यशराज शेट्टी यांचा सहभाग होता. 

या वेळी बोलताना योगेश गोगावले म्हणाले, ‘नरेंद्र मोदींच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीस देशवासीयांनी पसंती दिली व त्यांना पुन्हा एकदा प्रचंड बहुमत दिले. आता भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘सबका साथ सबका विकास’ या घोषणेबरोबरच नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘सबका विश्वास’ या घोषणेला प्रत्यक्षात उतरवायचे आहे आणि मोदींच्या स्वप्नातील विकासपर्व गाठायचे आहे.’


प्रदीप रावत म्हणाले, ‘ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा पुरस्कार भाजप करते. त्यांच्या स्मारक स्थळी नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी निमित्त जल्लोष केला जात आहे. हा अपूर्व संयोग असून, ज्या प्रकारचे राजकारण स्वातंत्र्यानंतर अपेक्षित होते ते सुशासन नरेंद्र मोदी यांनी देशाला दिले.’ 

‘ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना उपेक्षा सहन करावी लागते त्यांच्या विचारांचे सरकार स्थापन होत असल्याने या स्मारकाच्या ठिकाणी हा जल्लोष आयोजित केला आहे,’ असे आयोजक संदीप खर्डेकर यांनी सांगितले.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZLECA
Similar Posts
मोदी सरकारच्या शपथविधीवेळी रत्नागिरीत जल्लोष रत्नागिरी : फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि ‘मोदींचा विजय असो’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा जल्लोषपूर्ण वातावरणात रत्नागिरीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा साजरा करण्यात आला.
‘नवभारत निर्मितीच्या मार्गावर जाणारा अर्थसंकल्प’ नवी दिल्ली : देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री असलेल्या निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी, पाच जुलै रोजी त्यांचा पहिला अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात शेती, ग्रामीण विकास, कौशल्य विकास, गरिबांना सोयी-सुविधा, संशोधन, डिजिटल अर्थव्यवस्था, महिला सक्षमीकरण यावर भर देण्यात आला आहे. ‘हा
सर्वोत्कृष्ट विद्यापीठांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ दहाव्या स्थानावर पुणे : देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यंदा दहावे स्थान मिळवले आहे. सलग तिसऱ्या वर्षी विद्यापीठाने पहिल्या दहामध्ये स्थान कायम राखले आहे. गेल्या वर्षी या यादीत पुणे विद्यापीठ नवव्या स्थानावर होते. सर्व संस्थांच्या गटात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला १७वे स्थान मिळाले आहे
कौशल्यविकासातून समृद्धीकडे; वैशाली नाईक बनली यशस्वी फॅशन डिझायनर पुणे : राष्ट्रीय कौशल्य विकास मोहिमेचा चौथा वर्धापनदिन १५ जुलै २०१९ रोजी साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरू केलेल्या या योजनेचा लाभ देशातील खूप जणांनी घेतला आहे. पुण्यातील वैशाली नाईक या तरुणीनेदेखील या योजनेचा लाभ घेऊन आपल्या आयुष्याला नवा आकार दिला आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language